History
आपल्या बँकेची स्थापना सन १९९९ साली आदरणीय नेते शरदचंद्रजी पवार साहेबयांच्या शुभहस्ते झाली .नुकतेच आपल्या बँकेचे स्वमलिकच्या नूतन वास्तुचे उद्घटन सुद्धा लोकनेते व सहकारातील महामेरू आदरणी य पवारसाहेब यांच्या शुभहस्ते झाले हा योग्य खारोखऱच बँकेच्या सभासद व खातेदारांसाठी अत्यंत अनमोल असा होता.त्यावेळी अल्पावधीत केलेली प्रगती पाहून आदरणीय नेतेशरदचंद्रजी पवारसाहेब यांनी समाधान व्यक्त केले.आर्थिक ध्येयाप्रती काम करून समाजचे रंगरूप बदलून टाकायचे , या विचाराने प्रभावित होऊन प्रत्येक व्यक्तीची पतवृद्धी करायची , हाच बँकेचा मुख्य उद्देश आहे.विकासाकडून समृद्धीकडे जात असताना सर्वसामान्यांना त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देणारी बँक म्हणून एकवेगळा ठसा उमटविण्यात यशस्वी होत असल्याचे मनस्वी समाधान मिळत आहे .
पुणे जिल्ह्यासह अहमदनगर, सोलापूर, सातारा ,रायगड व ठाणे येथे कार्यरत असलेल्या या बँकेचा भोसरी , चाकण , चिखली, कोरेगाव , भीमा , राजगुरूनगर, आकुर्डी , शिंदेवासुली , दिघी व मांजरीबु ||असा १० शाखांचा विस्तार आहे .बँकेने भोसरी येते स्वमालकीची भव्य वास्तु उभारली आहे .या वास्तूमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा ग्राहक सेवेसाठी सज्ज आहेत .नवी अर्थनीती नवे राजकारण जोपासत १६ वर्षांपूर्वी स्थपन झालेल्या आपल्या बँकेच्या सध्या १० शाखा आहेत . भोसरी ,चाकण , चिखली, कोरेगावभीमा , राजगुरूनगर , शिंदेवासुली , दिघी, मांजरीबु ||व नगर जिल्ह्यातील संगमनेर येते शाखा आहेत . मार्च २०१६ अखेर बँकेच्या ठेवी २१० कोटी असून कर्जवाटप ११० कोटीचे आहे .वसूल भागभांडवल ८ कोटी ६३ लाख आहे . बँकेने सरकारी कर्ज रोख्यामध्ये व अन्य बँकामध्ये एकूण ८३ कोटीची गुंतवणूक केली आहे .बँकेस सतत ऑडिटवर्ग मिळालेला आहे .येणाऱ्या काळात बँकेच्या ठेवी ५०० कोटी व शाखासंख्या २० पर्यंत करण्याचा मा .संचालक मंडळाचा मानस आहे आणि मला विश्वास आहे कि ,आमचे हे उद्धिष्ट साध्य करण्यास सभासदांचा व ठेवीदारांचा विश्वास नक्कीच लाखमोलाचा आहे .स्पर्धात्मक बँकिंग मुळे ग्राहक सेवेला विशेष महत्वप्राप्त झाले आहे.ग्राहक सेवेवर आधारित बँकिंगमुळे स्पर्धेमुळे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे .ग्राहकांच्या गरजेनुसार बँकिंग कल्पना जोर धरत आहे .ग्राहकाला कोणत्या बँकिंग सेवांची बदलत्या काळानुसार गरज आहे याचा अभ्यास करून बँकेस आपले ठेवधोरण ,कर्जधोरण आखावे लागत आहे व ग्राहकांच्या गरजा विचारात घेऊन बँकेने आपली धोरणे आखलेली असल्याने बँकेची सेवा अल्पावधीतच ग्राहकाभिमुख झालेली आहे . भविष्यकाळातही आम्ही याच जोरावर यशाची सर्व शिखरे यशवीपणे पार करू असा मला विश्वास आहे .आधुनिकतेची कास धरून बँकेने ग्राहकाच्या सोयीसाठी कोअर बँकिंगचे तंत्रज्ञान सुरु केले आहे . तसेच भविष्यात ए. टी.एम .सुविधा सुरु करणार असून स्वतःचे अत्याधुनिक देता सेंटर आपणसुरु केले आहे .बँकेचे यशामागे असलेले एक महत्वाचे कारण म्हणजे कोणतेही धोरणात्मक निर्णय घेताना सर्वसंचालक मंडळ सदस्य व ग्राहकांनी बँक हितासाठी केलेल्या मार्गदर्शनाचे मूल्यमापन करूनच निर्णय घेतले जातात . यामुळे घेतलेल्या निर्णयामध्ये सर्व समावेशकता दिसून येते .बँकेची स्वमालकीची वास्तु असावी अशी बँकेच्या सभासदाची असलेली महत्वाकांक्षी योजना हि प्रत्येक्षात साकारण्यामागे सभासदाचे योगदान तेवढेच मोलाचे आहे . आपल्या आर्थिक आरोग्येची काळजी घेणारी फॅमिली बँक असे ब्रीदवाक्य घेऊन ते खऱ्या अर्थेने प्रत्येक्षात या बँकेने उतरवले आहे .अल्पावधीत बँकेची भरगोस प्रगती हि फक्त सभासद ,ठेवीदार , खातेदारयांचा बँकेवर असणारा मोठा विश्वास , तसेच बँकेच्या कामकाजात असलेली पारदर्शकता आणि प्रगतीमधील सातत्ययामुळेच झालेली आहे