Chairman's Desk


बँकेच्या स्थापने नंतर मे २०१० पर्यंत सलग ९ वर्षे बँकेच्या उपाध्यक्ष पदाची तर १२ मे २०१० पासून बँकेच्या चेअरमनपदाची धुरा सांभाळताना 'नवी अर्थनीती व नवेअ र्थकारण ' स्वीकारत लोकाभिमुख योजना अमलात आणल्या. त्यामुळे ' आपल्या आर्थिक आरोग्याची काळजी घेणारी फॅमिली बँक ' हि ओळख जनमानसात रुजली आहे. दहा शाखांच्या माध्यमातून बँक ग्राहकसेवा करत आहे . जिल्ह्याबाहेर कार्यक्षेत्र असणारी पिंपरी - चिंचवडमधील पहिली बँक हा बहुमान बँकेला मिळाला आहे . यशाचे टप्पे गाठत असताना बॅंकेने तंत्रनाण्याची कास सोडलेली नाही . अद्यावत सोयीसुविधा खातेदारांसाठीं उपलब्ध करून दिल्या आहेत . तळागाळातील लोकांना कर्जपुरवठा करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न बँक सात्तत्यताने करत आहे . गृहिणी ,उद्योजक , विध्यार्थी, ठेवीदार ,जेष्ठनागरिक यांच्यासाठी बँक विविध योजना राबवत आहे .

सभासद ,ठेवीदारांच्या हिताचे उत्तमरीतीने रक्षण करत आहे व भविष्यासाठी अनेक स्वप्नांची तरतूद आजच करून ठेवली आहे . भविष्यकाळातही उत्तोमोत्तम ग्राहकाभिमुख योजना देण्यासाठी बँक कटिबद्ध आहे . बँक घेत असेलेल्या या काळजीमुळे आपल्याला सातत्याने वैद्यानिक लेखा परीक्षणातून ' अ ' वर्ग मिळतो आहे .सहकारी बँकांचा महत्वाचा गाभा कर्ज वसुली आहे .उत्कृष्ट कर्ज वसुली व्यस्थापने बद्दल पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक्स अससोसिएशन कडून पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . ग्राहकांसाठी काही दिवसातच एटीएम सेवाही सुरु करत आहोत .तसेच बँकेने प्रशाकीय इमारतीत स्वतःचे डेटा सेंटर सुरु केले आहे . बँकिंग क्षेत्रातील अस्तित्व हे बँकेच्या आर्थिक सक्षमतेचे निकष हे रिझर्व बँकेने ठरवून दिल्यानुसारच असावे लागतात आपल्या बँकेने आधुनिक तंत्रांनाच अवलंब करून ग्राहकाभिमुख बँकिंग सेवा उपलब्ध करून देणे ,राजकारणविरहित स्वच्छ प्रसाशन व व्यवस्थापन , सतत सभासदांचा संपर्क व सहभाग , सभासदांचे प्रभोदन बाबीकडे विशेष लक्ष्य दिले आहे .

श्री नंदकुमार विठोबा लांडे
चेअरमन ,
अण्णासाहेब मगर सहकारी बँक मर्या.